'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी! (अतुल कहाते)

'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी! (अतुल कहाते)

- अतुल कहाते akahate@gmail.comअलीकडंच बंगालमध्ये सुदिप्त सेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसानं चिट फंड प्रकारच्या योजनेकडं गुंतवणूकदारांना आकर्षून घेतलं आणि भरपूर पैसे गोळा करून पोबारा केला. अशा प्रकारचे प्रकार दुर्दैवानं वारंवार घडूनसुद्धा आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्यामुळे बिचारे गुंतवणूकदार अशा योजनांकडं आकृष्ट होत राहतातच. अशा योजनांना पॉन्झी स्कीम्स, असं का म्हणतात, यामागची ही अद्भुत कहाणी.... 

वॉल स्ट्रीटवर गोंधळ घालणारा आणि प्रचंड मोठा गैरव्यवहार करणारा पहिला माणूस म्हणून आपण चार्ल्स पॉन्झीचं नाव आपण घेऊ शकत नसलो तरी असली कामं करण्यात सगळ्यात यशस्वी ठरलेला "घोटाळे'बाज माणूस म्हणून आपण पॉन्झीचा उल्लेख नक्कीच करू शकतो. फसवणुकीच्या बाबतीत त्यानं सगळ्यांना मागं टाकणारा असा काही कारनामा करून दाखवला, की तेव्हापासून कुणीही केलेल्या आर्थिक घोटाळ्यांना लोक सर्रास पॉन्झी स्कीम म्हणायला लागले! झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवून लोकांना टोप्या घालणारे अनेक बिलंदर असतात. या सगळ्यांवर कळस साधणारा म्हणून आपण पॉन्झीकडे बघू शकतो. इटलीमध्ये जन्मलेल्या पॉन्झीचं आयुष्य अत्यंत विचित्र होतं. त्याला कधी नीटपणे शिकायला मिळालंच नाही. त्यानं कामगार, कारकून, फळविक्रेता, स्मगलर, तस्कर आणि वेटर अशी अनेक कामं केली. आपल्या वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी पॉन्झीनं अर्थक्षेत्रात घुसायचं ठरवलं. जेमतेम पाच फूट उंची लाभलेला पॉन्झी दिसायला चांगला होता. त्याची अंगकाठी एकदम बारीक होती. त्याचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता; तसंच त्याला चांगली विनोदबुद्धी लाभली होती. तिचा तो अर्थातच चांगला वापर करून घेई. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरच्या माणसाला सहजपणे जिंकून घेण्यासारखी मिठास वाणी असल्यामुळे कुणालाही विश्वासात घेणं त्याला सहजपणे जमे

आपला फसवणुकीचा उद्योग पॉन्झीनं 1920 च्या सुरवातीला 150 डॉलर खर्चून सुरू केला. आपण ओल्ड कॉलनी फॉरिन एक्स्चेंज कंपनी नावाची कंपनी उघडली असल्याचं त्यानं जाहीर केलं. ही कंपनी आपल्याकडे पैसे गुंतवणाऱ्या लोकांना 45 दिवसांच्या काळात 50 टक्के व्याज देणार आणि 90 दिवसांनी मूळ मुद्दल दामदुप्पट करणार म्हणजे 100 टक्के व्याज देणार, असं आमिष त्यानं दाखवलं. पॉन्झीनं हा प्रकार अगदी योग्य काळात केला. कारण या काळात अमेरिकेमध्ये सगळीकडं तेजीचं वारे होते. बहुतेक सगळ्या लोकांकडे गुंतवण्यासाठी जास्त पैसे शिल्लक होते. इतक्या कमी वेळात आपल्याकडचे पैसे दुप्पट होणार असतील, तर चांगलंच आहे, असा विचार त्यामधल्या अनेक जणांनी केला. पॉन्झीनं आपल्या उत्कृष्ट संभाषणकलेच्या जोरावर तसंच आपल्यामधला विक्रेता कायम जागा ठेवत या गुंतवणूकदारांना सहजपणे भुरळ पाडली

आपण आपल्याकडे पैसे गुंतवणाऱ्या लोकांना इतका मोठा परतावा कसा काय देऊ शकतो, याचं उत्तर पॉन्झीकडं तयार होतं. अर्थातच त्याशिवाय लोकांनी त्याच्याकडं पैसे गुंतवताना आणखी प्रश् विचारले असते. यासाठी आपण इंटरनॅशनल पोस्टल युनियन छापत असलेल्या कूपन्सची परदेशांमध्ये खरेदी करणार असल्याचं पॉन्झीनं जाहीर केलं. असं कूपन परदेशी पत्र पाठवण्यासाठी चिकटवावं लागे. अशी कूपन्स मोठ्या संख्येनं विकत घ्यायची आणि परकीय चलनांच्या व्यवहारांमधल्या चढ-उतारांचा फायदा उठवून ही कूपन्स दुसऱ्या एखाद्या देशामध्ये खूप महाग किमतीला विकून टाकायची असा पॉन्झीचा बेत होता. साहजिकच परकीय चलनांच्या व्यवहारामध्ये स्वस्तात ही कूपन्स खरेदी करायची आणि नफेखोरी करून ती विकायची, असं त्याचं या व्यवहारामागचं सोपं सूत्र असणार होतं. शेअर दलालांपासून आपल्या नवऱ्याच्या निवृत्तिवेतनावर आयुष्य काढणाऱ्या विधवांपर्यंत सगळ्या प्रकारच्या लोकांनी पॉन्झीच्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले. सुरवातीला ही रक्कम फारशी नसायची. नंतर वर्तमानपत्रांनीसुद्धा पॉन्झीच्या योजनेला भरपूर प्रसिद्धी द्यायला सुरवात केल्यावर या रकमेत प्रचंड वाढ होत गेली. सुरवातीला आपल्या बोस्टनमधल्या कार्यालयातल्या कपाटाच्या खणांमध्ये पॉन्झी हे पैसे साठवत असे; पण लवकरच त्याच्याकडे जमा होत असलेल्या रकमेचा आकडा दर आठवड्याला 10 लाख डॉलरच्या घरात पोचायला लागल्यामुळे हे खण अपुरे पडायला लागले. त्यामुळे पॉन्झीनं वापरून फेकून दिलेले कागद साठवण्यासाठी म्हणून विकत घेतलेल्या कचऱ्याच्या डब्यांमध्ये हे पैसे साठवायला सुरवात केली. काही काळातच हेही पुरेनासं झाल्यावर पॉन्झीनं आपल्या कार्यालयात डॉलरच्या नोटांच्या थप्प्या रचायला सुरवात केली. या नोटांचा थर लोकांच्या पायाच्या नडगीच्या उंचीच्या वर जाऊन पोचला! पॉन्झीकडे जमा होत असलेले पैसे आटायची चिन्हं अजिबातच दिसत नव्हती. आपली भुक्कड योजना यशस्वी करण्यासाठी पॉन्झीला अशाच प्रकारच्या रकमेची गरज होती. कारण सातत्यानं आपल्याकडे नव्या गुंतवणूकदारांचे पैसे जमा होत राहिले, तरच आपण आपल्याकडे आधी पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांचं व्याज आपण चुकतं करू शकू, याची त्याला पुरेपूर कल्पना होती. एखाद्या मनोऱ्यासारखी म्हणजेच पिरॅमिडसारखी ही गुंतवणूक योजना होती. या मनोऱ्याच्या वरच्या बाजूला नव्या गुंतवणूकदारांच्या पैशांची भर पडत गेली तरच मनोऱ्याच्या तळाशी असलेल्या गुंतवणूकदारांना आपण व्याज देऊ शकतो, हे पॉन्झीला माहीत होतं. यानंतरच्याही सगळ्या फसव्या पिरॅमिड स्कीम्सची संकल्पना याच गृहितकावर आधारलेली आहे. जोपर्यंत नवे पैसे येत होते तोपर्यंत आधीच्या त्यानंतर त्यानंतरच्या, असं करत करत सगळ्या गुंतवणूकदारांना पॉन्झी व्याज देत राहिला. जर नव्यानं गुंतवणूक होणं थांबलं, तर या मनोऱ्यावर नवे मजले चढणं थांबणार आणि त्यामुळे आधीच्या गुंतवणूकदारांना व्याज देणं अशक् होणार, हे पॉन्झीला माहीत होतं

आपली गुंतवणूक योजना चांगलीच यशस्वी ठरत असल्याचं पाहून पॉन्झीनं आपल्या कंपनीच्या अनेक शाखा उघडायचं ठरवलं; तसंच या योजनेचे व्यवहार सांभाळण्यासाठी बॅंका आणि दलाल कंपन्यांना तिच्यामध्ये सहभागी करून घ्यायचे मनसुबेही त्यानं रचले. हॅनोव्हर ट्रस्ट कंपनी या कंपनीची मालकी आपल्याकडे येईल इतके शेअर विकत घेऊन त्यानं तिचं अध्यक्षपद स्वतःच्या ताब्यात घेतलं. त्यानंतर एक आलिशान घर घेऊन नोकरचाकरांना नेमून तो अगदी आरामात राहायला लागला. कहर म्हणजे पॉन्झी आधी ज्या कंपनीत नोकरी करायचा ती कंपनीसुद्धा त्यानं विकत घेऊन टाकली आणि आपल्या आधीच्या साहेबालाच नोकरीवरून काढून टाकलं. पैसे खर्चून टाकण्याच्या बाबतीत पॉन्झी कुठलाही विचार करत नसे. पैसे गुंतवण्याच्या बाबतीत मात्र आनंदीआनंदच होता. त्यामुळे त्यानं गुंतवणूकदारांकडून गोळा केलेल्या पैशांना अनेक वाटा फुटल्या होत्या. इंग्रजीमधला Robbing Peter to pay Paul  हा वाक्प्रचार तो अगदी शब्दशः खरी करून दाखवत होता. गुंतवणूकदारांना पॉन्झीनं पुरतं वेडं केलं होतं. अनेक जण त्याला इटलीमधला सगळ्यात महान माणूस म्हणायचे. बोस्टनमधल्या न्यायालयाला आणि बोस्टन पोस्ट नावाच्या वर्तमानपत्राला मात्र पॉन्झीच्या या योजनेविषयी खूप शंका वाटत होत्या. पॉन्झीची योजना म्हणजे लोकांची शुद्ध फसवणूक आहे, असा दाट संशय आल्यामुळे त्यांनी याची पाळंमुळं खणून काढण्यासाठी तपास चालू केला. यातून 1919 मध्ये फक्त 56,000 डॉलर किमतीची, तर 1920 मध्ये फक्त 75,000 डॉलर किमतीची कूपन्स छापण्यात आली असल्याचं उघडकीला आलं. प्रत्यक्षात पॉन्झीनं लोकांकडून कित्येक लाख डॉलर गोळा केले होते. साहजिकच सगळीच्या सगळी कूपन्स पॉन्झीनं काही करून मिळवली तरी तो आपल्याकडे जमा झालेले एवढे पैसे कुठे गुंतवणार, हा महत्त्वाचा प्रश् सोडवणं भाग होतं. काही जणांना याची चाहूल लागूनसुद्धा त्यांनी पॉन्झीच्या गैरप्रकाराकडं दुर्लक्ष केलं. त्यानंतर बोस्टन पोस्टनं केलेल्या संशोधनात काही वर्षांपूर्वीच्या मॉंट्रियालमधल्या एका पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणात पॉन्झी सहभागी असल्याचं आढळून आलं

हळूहळू पॉन्झीविषयी उलटसुलट बातम्या छापल्या जाऊ लागल्या. लोकांमध्ये त्याच्याविषयी अविश्वासाचं वातावरण वाढत गेलं. साहजिकच यामुळे मोठी खळबळ माजू शकते आणि गुंतवणूकदार आपल्याकडे ठेवलेले पैसे परत मागण्यासाठी मोठ्या संख्येनं येऊ शकतात, याची पॉन्झीला चांगलीच कल्पना होती. त्यामुळे पॉन्झीनं आपल्या गुंतवणुकीविषयीचा प्रचार वाढवला. त्यानं आपल्यावर करण्यात येणारे सगळे आरोप तर साफ फेटाळून लावलेच; पण त्याशिवाय आपल्याकडे केल्या जात असलेल्या गुंतवणुकीचे व्याजदर सरळ दुप्पट करून टाकले! 1920 च्या ऑगस्ट महिन्याच्या सुमाराला पॉन्झी आपल्या गुंतवणूकदारांना नियमितपणे व्याज देत असला, तरी तो आता कफल्लक झाला असल्याचं मत बोस्टन पोस्टनं व्यक्त केलं. यानंतर दोनच आठवड्यांनी पॉन्झीविषयीचं सत्य बाहेर आलं. पॉन्झीच्या कंपनीकडे कुठलीच मालमत्ता नसल्याचं आणि तिला एकूण 20 लाख डॉलरचं देणं असल्याचं जाहीर करण्यात आलं. पॉन्झीच्या खात्यातून फक्त 2 लाख डॉलर जप्त करण्यात आले

पॉन्झीवर भरण्यात आलेल्या खटल्यामध्ये ठेवण्यात आलेले आरोप त्यानं मान्य केले. तो धूर्त तर होताच; पण त्याचा हेतूसुद्धा निःसंशयपणे लोकांची फसवणूक करण्याचा होता. फक्त आपली पोल खूप लवकर खोलली जाईल, याचा त्याला अंदाज आला नसावा. खटल्याची सुनावणी सुरू असताना पॉन्झीला काही काळ जामिनावर सोडण्यात आलं. त्या वेळी पॉन्झीनं फ्लोरिडा राज्यात आणखी एक छोटी फसवणूक केली आणि त्यातूनही पैसे कमावले. नंतरच्या काळात त्याच्यावरचा खटला पूर्णत्वाला गेल्यावर पॉन्झीची बारा वर्षांसाठी तुरुंगात रवानगी झाली. 1934 मध्ये तुरुंगवास भोगून झाल्यावर पॉन्झीला इटलीमध्ये हाकलून देण्यात आलं. आपल्या अमेरिकेमधल्या ओळखींचा वापर करून घेण्यासाठी तिथंही आपण हॉटेलचा किंवा पर्यटनाचा व्यवसाय सुरू करणार असल्याचं त्यानं जाहीर केलं. प्रत्यक्षात यापैकी कुठलाच पर्याय त्यानं अमलात आणला नाही. त्या काळात इटलीमध्ये जोर धरत असलेल्या फॅसिस्ट विचारसरणीला अनुसरून त्यानं आपला प्रभाव पाडत इटालियन सरकारमध्ये साटंलोटं निर्माण केलं. रिओ जानेरियोमधल्या एका विमान कंपनीच्या बिझिनेस मॅनेजरपदावर त्याची नेमणूक करण्यात आली. यात काही अडचणी आल्या आणि शेवटी शिक्षक म्हणून कमी वेतनाच्या एका नोकरीवरच त्याला समाधान मानावं लागलं. 1949 मध्ये थोडं अंधत्व आणि मेंदूमध्ये आलेली गाठ अशा अवस्थेमध्ये पॉन्झीचं तिथंच निधन झालं. शेवटच्या काळात अर्धांगवायूच्या झटक्यामुळे तो अपंगच झाला होता. त्याची आर्थिक अवस्था इतकी खराब झाली होती, की त्याच्याकडे शेवटी फक्त 75 डॉलर शिल्लक होते आणि एका साध्याशा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. तरीही त्यानं आपलं नाव इतिहासात वाईट अर्थानं अजरामर मात्र केलं, हे नक्कीच!

 

Comments

Popular posts from this blog

Google Tags:- Daddy Film 2017 Bollywood 350 Mb movie download,Daddy Film 2017 Hindi HD movie,Daddy Film 2017 Hindi 480p Mkv mp4 3gp,Daddy Film 2017 torrent Hindi download,Daddy Film 2017 Hindi full DVDRip download,Daddy Film 2017 Hindi torrent DVDRip,Daddy Film 2017 Hindi pre-DVD Mkv Avi HD,Daddy Film 2017 Hindi full movie downloads,Daddy Film 2017 300mb Hindi movie DVD SCR 700mb download,Daddy Film 2017 300MB 2016 Hindi Movie DVDScr 700MB Download,Daddy Film 2017 Full Movie Free Download,Daddy Film 2017 Mp4 Mobile Movie,Daddy Film 2017 Avi Mobile Movie,Daddy Film 2017 HD Mp4 Movie Download ,Daddy Film 2017 Android HD 480p, 720p Mobile Movie ,Daddy Film 2017 FullHD 1080p Movie Download,Daddy Film 2017 Mkv Movie Download,Daddy Film 2017 Pc Computer Full Movie Free Download,Daddy Film 2017 300mb, 200mb, 400mb, 500mb, 600mb, 700mb, 800mb, 900mb, 1Gb, 2Gb HD Movie Download, Www.Daddy Film 2017 Movie.Com, Daddy Film 2017 Mobile Movie Free Download.

Movie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू