Marathi lekh पोटाचा घेर वाढणार नाही तर काय?..

कशी काय तुमची तब्येत?.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..
आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. कारण हा लठ्ठपणा एका दिवसात कधीच वाढत नसतो आणि कालच्यापेक्षा आज मी अमूक इतका जाड झालो, असं लगेच दाखवताही येत नाही. कारण ही प्रक्रिया हळूहळू पण निश्चितपणे होत असते.. ती प्रक्रिया समजून घेतली तर अनेकांची लठ्ठपणाची समस्या दूर होऊ शकेल..

कसा वाढत जातो आपला घेर?..
- आॅफिस असो कि घर.. आपण किती वेळ 'बसून' असतो, याचा विचार प्रत्येकानं करायला हवा. भले तुम्ही काम करीत असाल, पण ते बैठं असेल, तर पोटावरच्या सुरकुत्या निश्चितपणे वाढत जाणार.
- आपल्या घरात आणि फावल्या वेळी, बाहेर, आॅफिसात वेफर्सची पाकिटं, शितपेयं, सोड्याच्या बाटल्या किती वेळा आपल्या हातात? त्यांचा आकार तुमच्या लक्षात येतोय? नीट पाहिलं तर ही पाकिटं दिवसेंदिवस फुगत जातानाच तुम्हाला दिसतील. ही पाकिटं त्यांच्याबरोबर आपल्यालाही फुगवतात.
- आज करू, उद्या करू, म्हणून व्यायामाला किती वेळा तुम्ही पुढे ढकलंलय? किती वेळ, किती दिवस सलगपणे व्यायाम केलाय? करताय? अगदी व्यायाम जरी केला नाही, तरी किती गोष्टी तुम्हाला 'बसल्या जागी' मिळताहेत? त्यासाठी किमान चालायचे तरी कष्ट आपण घेतोय का?
- तुमचा बीएमआय कधी मोजलाय? म्हणजे तुमचा बॉडी मास इंडेक्स? आपलं वजन, वय आणि उंची यानुसार आपला बीएमआय ठरतो. तो जर २५ ते ३०च्या दरम्यान असेल, तर तुम्ही लठ्ठ आहात आणि ३०च्या पुढे गेला असेल तर अतिलठ्ठ! त्यावर तरी विश्वास ठेवाल की नाही?
- कोणतीही गोष्ट एकदम होत नाही. तुम्ही जसं हळूहळू लठ्ठ झालात, तसंच हळूहळूच बारीक होऊ शकाल. पोटाचा घेर कमी करू शकाल. त्यासाठी आहे तुमची तयारी?.. हळूहळूच, पण सुरुवात तरी नक्की करावी लागेल.
कराल आजपासून?.. कारण 'उद्या' कधीच येत नाही..

 

Comments

Popular posts from this blog

Google Tags:- Daddy Film 2017 Bollywood 350 Mb movie download,Daddy Film 2017 Hindi HD movie,Daddy Film 2017 Hindi 480p Mkv mp4 3gp,Daddy Film 2017 torrent Hindi download,Daddy Film 2017 Hindi full DVDRip download,Daddy Film 2017 Hindi torrent DVDRip,Daddy Film 2017 Hindi pre-DVD Mkv Avi HD,Daddy Film 2017 Hindi full movie downloads,Daddy Film 2017 300mb Hindi movie DVD SCR 700mb download,Daddy Film 2017 300MB 2016 Hindi Movie DVDScr 700MB Download,Daddy Film 2017 Full Movie Free Download,Daddy Film 2017 Mp4 Mobile Movie,Daddy Film 2017 Avi Mobile Movie,Daddy Film 2017 HD Mp4 Movie Download ,Daddy Film 2017 Android HD 480p, 720p Mobile Movie ,Daddy Film 2017 FullHD 1080p Movie Download,Daddy Film 2017 Mkv Movie Download,Daddy Film 2017 Pc Computer Full Movie Free Download,Daddy Film 2017 300mb, 200mb, 400mb, 500mb, 600mb, 700mb, 800mb, 900mb, 1Gb, 2Gb HD Movie Download, Www.Daddy Film 2017 Movie.Com, Daddy Film 2017 Mobile Movie Free Download.

'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी! (अतुल कहाते)

Movie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू