Tula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...!

Tula Kalnnaar Nahi Movie Review:फाटे फुटलेल्या ट्रॅकवरची 'रोड स्टोरी'...!

राज चिंचणकर

अलीकडे रोड स्टोरीचा चित्रपटांमध्ये  बराच संचार सुरु आहे आणि 'तुला कळणार नाही' हा चित्रपटही अशाच रोडवरून पळत सुटला आहे. नाही म्हणायला यात भावनांची आंदोलने, तुटू पाहणारी नाती जोडण्यासाठी केलेली कसरत वगैरे विविध प्रकार आहेत. त्यामुळे करमणुकीसाठी जो बार भरायला हवा, तो या बंदुकीत पूर्ण भरला आहे. तरी सुद्धा, थोड्या विस्कळीतपणाचे गालबोट त्याला लागल्याने ही फाटे फुटलेल्या ट्रॅकवरून पळणारी रोड स्टोरी बनली आहे

 
नवरा-बायकोत अनेकदा 'तूतू-मैंमैं' होत असतेच; पण म्हणून काही सगळेजण थेट घटस्फोटाची पायरी चढत नाहीत. पण या चित्रपटातले राहुल आणि अंजली हे मात्र त्या निर्णयापर्यंत पोहोचले आहेत. अशातच काही कारणांमुळे दोघेही स्वतंत्रपणे गोव्याला जायला निघाले आहेत. एका आग लागून गेलेल्या हॉस्टेलच्या कपाटात सापडलेली बबडू नामक प्रेमवीराची डायरी त्याच्या प्रेयसीपर्यंत पोहोचवण्यासाठी राहुलचा हा दौरा आहे. परंतु, त्याच्या या प्रवासात एका वळणावर त्याची अंजलीशी अचानक भेट होते आणि एकमेकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना एकत्र प्रवास करावा लागतो. त्यातच पुढे सचिन या राहुलच्या मित्राने त्याच्यासाठी उपलब्ध करून दिलेली खास सोय, मेनका नामक तरुणीचे त्याच्या आयुष्यात डोकावणे, अंजलीच्या कुटुंबाची अचानक होणारी एन्ट्री अशा विविध पातळयांवर हेलकावे खात ही कथा राहुल अंजलीच्या नात्याभोवती फिरत राहते

समीर अरोरा यांच्या कथेवर, त्यांच्यासह शिरीष लाटकर यांनी पटकथा बेतली आहे; तर संवादांची जबाबदारी शिरीष लाटकर यांनीच उचलली आहे. या कथेत म्हटले तर दम आहे; मात्र मध्यंतरानंतर पटकथा विस्कळीत झाली आहे. नायक आणि नायिकेला एकमेकांविषयी आतून वाटत असलेली ओढ त्यांच्याच गळी उतरवण्यासाठी इतर दोन जोडप्यांचे घेतलेले संदर्भ मूळ कथेला वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जातात. मध्येच नायिकेचे चुलतभाऊ म्हणून हिंदी चित्रपटात शोभतील अशा धटिंगणांची होणारी एन्ट्री वगैरे प्रकार बाष्कळ झाला आहे. एकाच संवादात नायक त्याच्या सासऱ्याच्या मनात त्यांच्या दुरावलेल्या मुलीविषयी पुन्हा प्रेमभावना वगैरे निर्माण करतो, हेही सहज पचनी पडत नाही

 
दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी या कथेची मांडणी चांगली केली आहे. एक 'एंटरटेनमेन्ट पॅकेज' देण्याचा त्यांनी यातून प्रयत्न केला आहे हे स्पष्ट आहे. साहजिकच, डोक्याला काही प्रश्न पडलेच तर त्यांची उत्तरे शोधण्याच्या भानगडीत पडता या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा, असेच त्यांचे सांगणे असावे. त्यांचा अजून एक फंडा आहे आणि तो म्हणजे जे काही करायचे ते प्रशस्त अगदी तब्येतीत करायचे. मग यातून 'वेळ' या घटकाचीही सुटका नसते. त्यांचा हा चित्रपट याच पाऊलवाटेवरून चालला असून, त्याने ही कथा संपवण्यासाठी मुबलक वेळ घेतला आहे. या कथेला कात्री लागली असती, तर हा चित्रपट अधिक आटोपशीर झाला असता

 
राहुलची व्यक्तिरेखा साकारताना सुबोध भावेला पूर्णतः रोमँटिक भूमिकेत वावरण्याची संधी यात मिळाली आहे आणि तिचा अधिकाधिक फायदा त्याने उठवला आहे. सोनाली कुलकर्णीने चांगले काही देण्याचा प्रयत्न करत यात अंजली रंगवली आहे. नीथा शेट्टीची धडाकेबाज मेनका जमून आली आहे. सुशांत शेलार, जयवंत वाडकर, उदय टिकेकर, अनुराधा राजाध्यक्ष, रसिका सुनील, संग्राम साळवी आदी कलाकारांच्या वाट्याला छोट्या छोट्या भूमिका यात आल्या आहेत. एकूणच, नातेसंबंधांच्या धाग्यात अडकून घेण्यासाठी; परंतु तसे करताना डोके बाजूला काढून ठेवत या चित्रपटाचा आस्वाद घेतला तर निव्वळ मनोरंजन करण्याचे काम मात्र या चित्रपटाने केलेले दिसते.  

Comments

Popular posts from this blog

Google Tags:- Daddy Film 2017 Bollywood 350 Mb movie download,Daddy Film 2017 Hindi HD movie,Daddy Film 2017 Hindi 480p Mkv mp4 3gp,Daddy Film 2017 torrent Hindi download,Daddy Film 2017 Hindi full DVDRip download,Daddy Film 2017 Hindi torrent DVDRip,Daddy Film 2017 Hindi pre-DVD Mkv Avi HD,Daddy Film 2017 Hindi full movie downloads,Daddy Film 2017 300mb Hindi movie DVD SCR 700mb download,Daddy Film 2017 300MB 2016 Hindi Movie DVDScr 700MB Download,Daddy Film 2017 Full Movie Free Download,Daddy Film 2017 Mp4 Mobile Movie,Daddy Film 2017 Avi Mobile Movie,Daddy Film 2017 HD Mp4 Movie Download ,Daddy Film 2017 Android HD 480p, 720p Mobile Movie ,Daddy Film 2017 FullHD 1080p Movie Download,Daddy Film 2017 Mkv Movie Download,Daddy Film 2017 Pc Computer Full Movie Free Download,Daddy Film 2017 300mb, 200mb, 400mb, 500mb, 600mb, 700mb, 800mb, 900mb, 1Gb, 2Gb HD Movie Download, Www.Daddy Film 2017 Movie.Com, Daddy Film 2017 Mobile Movie Free Download.

'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी! (अतुल कहाते)

Movie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू